आणीबाणी’ म्हटलं की ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील  दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्कील लिखाणाने प्रहार करत लेखक अरिवद जगताप यांनी वेगवेगळे मुद्दे चित्रपटातून आजवर मांडले आहेत. आता आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट ते घेऊन आले आहेत. ही ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या आणीबाणीतून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा यात मांडण्यात आली आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरिवद जगताप यांच्या साथीने दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप मनोरंजनाची मिसळ आपल्याला चाखायला देणार आहेत. मनोरंजनाची ही मिसळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिनेश जगताप व्यक्त करतात.  गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader