१४ मराठी चित्रपटांची कोटय़वधींची उड्डाणे
चांगले विषय, चांगले कलाकार, चांगले दिग्दर्शक, दर्जेदार निर्मिती आणि तितकीच चांगली प्रसिध्दी यांच्या जोरावर मराठी चित्रपटांनी तिकीटबारीवरही आपली किमया दाखवायला सुरुवात केली आहे. मराठी चित्रपटनिर्मितीचा आकडा २०१५मध्ये तब्बल २५ टक्क्यांनी वाढला. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी तब्बल १४ मराठी चित्रपटांनी तिकीटबारीवर १० ते ४० कोटींच्या दरम्यान कमाई केली असून हा एक प्रकारचा विक्रम समजला जातो.
गेल्या दोन वर्षांत मराठीतला एखादाच चित्रपट १० कोटी रुपयांच्या पुढे कमाई करीत असे. विर्षांला ७० ते ८० चित्रपट मराठीत प्रदर्शित होतात. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत चित्रपटांची चर्चा होते आणि एखाद्यालाच १० कोटींच्या पुढे जाता येते, हे मराठी चित्रपटांचे चित्र गेल्या वर्षीच्या तिकीटबारीवरील सततच्या हलत्या आकडय़ांनी बदलून टाकले आहे. २०१५ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी सुगीचे वर्ष ठरले आहे. १४ चित्रपट १० कोटी रुपयांच्या पुढे, त्यापैकी ७ चित्रपटांची कमाई ही १५ कोटी रुपयांच्या पुढे आहे. चांगला विषय आणि चांगली प्रसिध्दी यामुळे मराठी चित्रपटांना आर्थिक यशाची घडी बसवता आली, अशी माहिती ‘एव्हरेस्ट’चे संजय छाब्रिया यांनी दिली. सध्या राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २४ जिल्ह्य़ांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचल्याने त्याचाही फायदा चित्रपटांना मिळतो आहे, अशी माहिती मराठी चित्रपटांसाठी प्रसिध्दीचे काम पाहणाऱ्या गणेश गारगोटे यांनी दिली. चांगल्या कथा लिहिल्या गेल्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपटांसाठी मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे ओढला गेला, असे मत अभिनेता अंकुश चौधरीने व्यक्त केले.
* टाइमपास – ४० कोटी
* कटय़ार काळजात घुसली – ३१ कोटी
* क्लासमेट – २१ कोटी
* डबलसीट – २० कोटी
* मुंबई पुणे मुंबई – १७ कोटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा