छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

https://mobile.twitter.com/taran_adarsh/status/1498226277714579458

“मराठी चित्रपट पावनखिंड हा हिट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिला आठवडा – १२.१७ कोटी, आठवड्याच्या शेवटी – शुक्रवार १.०२ कोटी, शनिवार १.५५ कोटी, रविवार १.९७ कोटी…. एकूण – १६.७१ कोटी”, असे तरण आदर्श या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉट शेअर करत दिग्पाल लांजेकर यांनी ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे.

“हृदयाचे ठोके वाढले आहेत…”, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमुळे चाहते चिंतेत

दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie 2022 pawankhind box office collection day 10 know about it nrp
First published on: 28-02-2022 at 19:53 IST