काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षक म्हणून आपल्या मनात कायम घर करुन राहतात. यातील कलाकार, संवाद, गाणी यांची वर्षानुवर्षे चर्चा होत असते. याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी. या चित्रपटाने लाखो नव्हे तर करोड प्रेक्षकांच्या हृदयात हक्काचे स्थान निर्माण केले. हा चित्रपट कित्येक वेळा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही. अनेकदा या चित्रपटाचा रिमेक का बनवला जात नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असतो. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एकदा याबाबत उत्तर दिले होते.

आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याला आज ३४ वर्ष पूर्ण झाली. ‘अशी ही बनवाबनवी’ या मराठी चित्रपटाला ५० आठवडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. चित्रपटाच्या ‘गोल्डन ज्युबिली’चा शो खूप गाजला. त्यावेळी बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार उपस्थित होते. या चित्रपटाचा रिमेक बनवावा, अशी अनेक चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचाही रिमेक बनवणार का असा प्रश्न एका चाहत्याने सचिन पिळगावकर यांना विचारला होता. त्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते.
आणखी वाचा : विश्लेषण : ऑस्कर पुरस्कारासाठी भारतीय चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Nana Patole Criticize Devendra Fadnavis ,
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…

सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावर फारच सक्रीय असतात. काही वर्षांपूर्वी फक्त मराठी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने त्यांना हा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचे खूप चाहते आहे. पण त्याचा रिमेक कधीही बनू शकत नाही. कारण आपण लेजंड्स गोष्टींना हात लावू नये. आगीशी कधीच खेळू नये. कारण जर त्याचा रिमेक बनला तर मग त्याची तुलना केली जाईल आणि मग त्यावरुन विनाकारण ट्रोलिंग होईल. त्यावरुन मला शिव्याही पडतील. हे कशाला करायचं?

त्यापेक्षा जे आहे ते राहू द्यावं. ताजमहाल संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे. जर त्यात एखादी वीट असती तर तिच्या सौंदर्य कमी राहिली असती. अशी ही बनवाबनवी चित्रपटाचेही असेच आहे. तो ज्या काळात बनला, ती वेळ, कास्टिंग, गाणी सर्व काही परफेक्ट होतं. लेखक वसंतराव सबनीस आणि प्रत्येक गोष्टीची भट्टी जमली. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. हिंदीतही अनेकांनी रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडावर आपटले. त्यामुळे आपण रिमेक बनवू नये असं मला वाटतं”, असे सचिन पिळगावकर यांनी म्हटले.

आणखी वाचा : नागाचैतन्यशी घटस्फोटानंतर समांथा पुन्हा अडकणार लग्नबंधनात? घेतला मोठा निर्णय

दरम्यान ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला आता जवळपास ३४ वर्षे उलटून गेली तरी आजही या चित्रपटाची जादू जराही कमी झालेली नाही. मराठी चित्रपटाचे सोनेरी पान असा या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. यातील अनेक कलाकार, त्यातील डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत.

Story img Loader