अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या शु्क्रवारी ‘फँड्री’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटात प्रेमकथेच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्थेवर भाष्य करण्यात आले आहे. ‘फँड्री’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे मराठीत दुनियादारी आणि टाईमपास नंतर ‘फँड्री’ चित्रपटाच्या यशाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘फँड्री’ चा दिग्दर्शक नागराज मंजुळेने या चित्रपटाच्या माध्यमातून कोवळ्या वयातील प्रेम आणि त्याला असलेली जातीव्यवस्थेतील दाहकतेची किनार पडद्यावर साकारली आहे. सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रविण तरडे, किशोर कदम आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने फॅंड्री सजला आहे. या चित्रपटाचे संवाद लिहण्याची जबाबदारी नागराज सोबत भूषण मंजुळे यांनी पेलली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा