आयफा पुरस्कारांच्या धर्तीवर मराठी नाटय़-सिनेसृष्टीतील कलावंतांनी मराठी नाटक आणि सिनेमा सातासमुद्रापार नेण्यासाठी मिक्टा पुरस्कार सोहळा केला. आता शार्दूल क्रिएशन्स आणि इंटरनॅशनल कल्चरल फोरम या संस्थांतर्फे ‘मराठी चित्रपट महोत्सव’ फेब्रुवारीत मॉरिशस येथे आयोजित करण्यात आला आहे. दिग्दर्शक शिरीष राणे, अभिनेता विजय पाटकर, दिलीप ठाणेकर, अनंत भालेकर, अजय कापरे, विराज वढावकर यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या या पहिल्या महोत्सवात मॉरिशसमधील मराठी लोकांना आठ मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मराठी सिनेनाटय़ कलावंतांचे कार्यक्रमही तेथे होणार आहेत. या महोत्सवात मराठी चित्रपटांची निवड केली जाणार असून त्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत ६६६.ेऋ2.्रल्ल या संकेतस्थळाद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. ‘मुंबई ते मॉरिशस’ हा मराठी चित्रपट पडद्यावर खूप वर्षांपूर्वी झळकला होता. आता मराठी चित्रपट भविष्यात मॉरिशसमध्ये नियमितपणे प्रदर्शित करता यावेत तसेच मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी मॉरिशसमधील सोयीसुविधा यासंदर्भात या महोत्सवात महत्त्वाचा परिसंवाद होणार आहे. ‘आयफा पुरस्कारां’मुळे हिंदी चित्रपटांना परदेशी बाजारपेठ मिळण्यास मोठी मदत झाली आहे. त्या धर्तीवर परदेशात पुरस्कार सोहळे भरवूनही मराठी चित्रपटांना अद्याप प्रदर्शन, चित्रीकरण व अन्य गोष्टींसाठी व्यासपीठ मिळालेले नाही. परंतु, मॉरिशसमध्ये मोठय़ा प्रमाणावर मराठी लोक असूनही त्याचा लाभ मराठी चित्रपटांना व्हावा या दृष्टीने ‘मराठी चित्रपट महोत्सव’ यंदा मॉरिशसमध्ये आयोजित करण्याचे ठरविले, अशी माहिती दिग्दर्शक व या महोत्सवाचे एक प्रमुख शिरीष राणे यांनी दिली.
मॉरिशसमध्ये ‘मराठी चित्रपट महोत्सव’
आयफा पुरस्कारांच्या धर्तीवर मराठी नाटय़-सिनेसृष्टीतील कलावंतांनी मराठी नाटक आणि सिनेमा सातासमुद्रापार नेण्यासाठी मिक्टा पुरस्कार सोहळा केला. आता शार्दूल क्रिएशन्स आणि इंटरनॅशनल
आणखी वाचा
First published on: 09-02-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie festival in marishes