मनोरंजनाचे परिपूर्ण नाट्य असलेला ‘हुतूतू’ हा धमाल मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झालाय. हर्षवर्धन भोईर व भाऊसाहेब भोईर निर्मित, कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतूतू’ चित्रपटात खेळाचा आखाडा नसला तरी नात्यांची अनोखी धोबीपछाड अनुभवायला मिळणार आहे. प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला ‘हर्ष फिल्मस’ निर्मित ‘हुतूतू’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा सेलिब्रिटीज्‌च्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बॉलीवूड अभिनेते जितेंद्र, सतीश शहा, विधान सभेचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप वळसे पाटील, मार्तंड अधिकारी, गौतम अधिकारी, निर्माते भाऊसाहेब भोईर, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकार – तंत्रज्ञ आवर्जून उपस्थित होते. अशोक सराफ, वर्षा उसगांवकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, जयवंत भालेकर, अतुल तोडणकर, संजय खापरे आणि कांचन अधिकारी या कलाकारांचा दमदार अभिनय ‘हुतूतू’ मध्ये पहाता येणार आहे.

Story img Loader