एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याचा मोठय़ा प्रमाणात गाजावाजा होण्याचा आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पारितोषिके मिळविण्याचा मान ‘जयजयकार’ चित्रपटाला मिळाला आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून तेही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतात, असा विचार या चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट १३ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे आहे.
गोव्याच्या फिल्म बझार फेस्टिव्हलच्या परीक्षकांनी देशभरातील विविध भाषांमधून निवडलेल्या २२ चित्रपटांत याचा समावेश केला आहे. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शनासाठी शंतनु रोडे यांना तर सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून या चित्रपटातील अभिनेता संजय कुलकर्णी यांना गौरविण्यात आले होते.जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट पदार्पणाचे दिग्दर्शनासाठीचे पारितोषिक मिळाले आहे. पुणे आंतररष्ट्रीय चित्रपट महोत्सव, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
सांगली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जयजयकार’साठीच दिलीप प्रभावळकर यांना सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून तसेच प्रेक्षकांच्या पसंतीचा सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा गौरव झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

   

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie jai jai kar