मराठीत ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांच्या एकाच वेळी पसांतीस येतील असे चित्रपट अपवादाने निर्माण होताना दिसतात, हेच लक्षात घेऊन सर्वांचे मनोरांजन होईल यादृष्टीने निर्माते सतीश आणि विशाल तेलंग यांनी ‘लक्ष्मी..तुझ्याविना’ या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या पण रहस्य, नाट्य, रोमांच आणि थरार यांनी परिपूर्ण अश्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या २८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
एका छोट्याश्या गावात घडणारी ही गोष्ट आहे, यातील प्रेमकथा एकाच वेळी दोन वेगळ्या काळात म्हणजेच १९७० ते ८० चे दशक आणि २०१३ सालात घडताना पडद्यावर दिसते. सिनेमाचा नायक क्रिश आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही रहस्यमय आणि नाट्यमय घटनांतून हा चित्रपट साकारतो. हलकेफुलके विनोदी प्रसंग आणि कर्णमधुर गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. सांपूर्ण कुटुंबाचे मनोरांजन करणाऱ्या या चित्रपटातून छोट्या शहरातल्या महिलांच्या सबलीकरणाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला आहे.
दीपक कदम दिग्दर्शित या चित्रपटाचा नायक उदयोन्मुख अभिनेता संजय शेजवळ असून त्याला यापूर्वी ‘प्रिया बावरी’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नाटकासाठी म. टा सन्मान तसेच राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करणारी आघाडीची अभिनेत्री सई रानडे आणि मराठी तसेच तामिळ चित्रपटातली उगवती तारका प्रियांका ज्ञानलक्ष्मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ह्या तिन्ही अभिनय संपन्न चेहऱ्यांमुळे चित्रपटाला फ्रेश लुक लाभला आहे. या तिघांच्याही अप्रतिम अदाकारीमुळे प्रेक्षकांना एक वेगळा, मनोरंजक आणि दर्जेदार चित्रपट पाहायला मिळेल असा विश्वास निर्माते सतीश आणि विशाल तेलंग यांना आहे.
त्रिलोक चौधरी यांचे छायांकन असलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते चंदन जमदाडे आहेत. या चित्रपटाचे कर्णमधुर भावगर्भ गूढ संगीत जगदीश पाटील यांनी दिले असून सतीश तेलंग लिखित या गीतांवर आकर्षक नृत्य रचना महेश चव्हाण यांनी केली आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांचे सहाय्यक असलेल्या चव्हाण यांनी नृत्यांना दिलेले संपूर्णपणे नवे रूप आणि कर्णमधुर गाणी पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाकडे वळतील असा ठाम विश्वास निर्मात्यांना आहे.
‘लक्ष्मी..तुझ्याविना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठीत ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांच्या एकाच वेळी पसांतीस येतील असे चित्रपट अपवादाने निर्माण होताना दिसतात, हेच लक्षात घेऊन सर्वांचे मनोरांजन होईल...
आणखी वाचा
First published on: 27-03-2014 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie laxmi tuzyavina