‘काकस्पर्श’, ‘धग’, ‘बालक पालक’, ‘अनुमती’ आणि ‘इन्व्हेस्टमेंट’ अशा टॉप फाईव्ह चित्रपटांच्या स्पर्धेत कांचन आधिकारी दिग्दर्शित ‘मोकळा श्वास’ या चित्रपटाचा निभाव तो काय लागणार, त्याला पारितोषिके ती किती मिळणार असे वाटत होते, पण विविध ठिकाणी मिळून या चित्रपटाने तब्बल दहा पुरस्कार पटकावून आपलेदेखिल अस्तित्व दाखवले.
सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट नायिका नवा चेहरा अशा स्वरुपाचे हे पुरस्कार आहेत. सह्याद्री वाहिनी, संस्कृती कलादर्पण, दादासाहेब फाळके पुरस्कार समिती अशा विविध प्रकारचे हे पुरस्कार आहेत. आपल्या पुढील चित्रपटासाठी अधिक उत्साहाने कांचन आधिकारीने घोडदौड करावी असेच हे यश आहे.
आणखी वाचा