आपल्या मातीतली गोष्ट सांगताना ती वैश्विक स्तरावरील प्रेक्षकाला म्हणण्यापेक्षा कुठल्याही स्तरातील माणसाला आपलीशी वाटली पाहिजे, मनाला भिडली पाहिजे तर ती यशस्वी ठरते. खेडोपाड्यांमध्ये पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आपल्याला माहिती आहे. खरंतर मुंबई – दिल्लीसारख्या महानगरांमध्येही एका वेगळ्या अर्थाने पाण्यासाठी संघर्ष करावाचा लागतो. एकीकडे पैसे मोजावे लागतात, तर दुसरीकडे पैसाही नसल्याने स्वत: उन्हातान्हात वणवण करावी लागते. ‘पाणी’ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटात गावात पाणी आणून किमान पाण्याच्या बाबतीत गावाला स्वावलंबी करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा रंगवताना आदिनाथ कोठारेने पाण्यासाठीचा हा भयाण संघर्ष आणि एकजुटीने प्रयत्न केले तर वैराण, ओसाड जागेतही पाण्याचा ओलावा निर्माण होऊ शकतो हे आशादायी वास्तव दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा