महिला सक्षमीकरणावर अनेक चर्चा होताना दृष्टिस पडतात, मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण होतांनाचीच उदाहरणे मोठ्या प्रमाणावर समोर येतात. असे असताना देखील काही जणी आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन आपले आयुष्य निडरपण व यशस्वीपणे जगताना दिसतात. हाच धागा पकडून धुळे येथे घडलेली प्रत्यक्ष घटना ‘पाशबंध’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आनंदराम यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गशिश फिल्म्स निर्मित ‘पाशबंध’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंदराम यांचे असून, कथा, पटकथा व संवादसुद्धा त्यांचेच आहेत. धुळे येथील एक साधारण महिला आपल्या नशिबी आलेले दुर्भाग्यपूर्ण जीवन न डगमगता कशा रीतीने जगते हे या चित्रपटात दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक आनंदराम सांगतात. सदर महिलेचे पात्र रंगविणे हे फार कठीण असल्याचे सांगत केवळ दिग्दर्शक आनंदराम यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच आपण ही भूमिका साकारू शकल्याची भावना अभिनेत्री नंदिता धुरीने व्यक्त केली. विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘पाशबंध’ चित्रपटाला विविध विभांगांमध्ये नामांकने तसेच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सदर चित्रपटात ३ गाणी असून, एका ओवीचासुद्धा समावेश आहे. चित्रपटाला आंनद ओक यांनी संगीत दिले असून, सुरेश घायवट यांनी गीते लिहिली आहे. २२ मे २०१५ रोजी ‘पाशबंध’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा