मराठी चित्रपटात कलाकारांच्या अभिनयाबरोबरच त्यातील आशयालादेखील प्राधान्य दिले जाते. असाच आशय आणि अभिनयसंपन्न असलेला ‘फुलवंती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘फुलवंती’ची प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजाश्रय मिळत असे, याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात जात असे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसह प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, हृषीकेश जोशी, स्नेहल, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदी मराठीतील नामवंत कलाकारांची फौज दिसणार आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांचे आहे. छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.