निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती परंपरेचा विलक्षण ठेवा असणाऱ्या या मनोहारी… लोकेशन ची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल ! आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे.

कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळला सुद्धा लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या काही भागचं चित्रिकरण केरळमध्येही झालं आहे. याकारणास्तव या चित्रपटात कोकण आणि केरळ यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. केरळमधील प्रसिद्ध “विझार्ड प्रोडक्शन” या चित्रसंस्थेच्या माध्यमातून ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.
चिपळूण, कणकवली, कुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्र मेढेकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव, विश्वजित पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत.

zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
we want old Mukta says netizens on premachi goshta maha episode promo
“आम्हाला जुनी मुक्ता पाहिजे”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तेजश्री प्रधान असती तर…”
फसक्लास मनोरंजन
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…

‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात कि, ‘सगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव ‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल’,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत. चित्रपटाची संहिता सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, संगीत विश्वजिथ यांचे तर नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. जय कुमार नायर, रफिक टी. एम आणि चैत्राली डोंगरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Story img Loader