व्हेलेंटाइन डे… प्रेमाचा दिवस…. जगातील तमाम प्रेमीजन ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा वर्षातला स्पेशल डे. या दिवसाला खास करण्यासाठी प्रेमी जोडप्यांच्या योजना एव्हाना सुरु झाल्या असतील. या दिवसाला अजून स्वप्नपंखी करण्यासाठी रुपेरी पडद्यावर येत आहे एक मराठमोळी लवस्टोरी…. ‘प्रियतमा’. या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव झळकणार असून, त्याची नायिका असणार आहे गिरीजा जोशी.
चित्रपटाची कथा सचिन दरेकर यांची असून याचे संवाद सचिन दरेकर, प्रशांत लोके यांनी लिहले आहेत. प्रेमाची उत्सुकता वाढवणारी कहाणी असलेला ‘प्रियतमा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie priyatama releasing on 14 february