बदलत्या काळानुसार प्रेमाचे स्वरूप बदलले पण मूळ भावना तीच राहिली. इतिहासात डोकावले तर अनेक प्रेमकथा सापडतील मग ती बाजीराव-मस्तानी असो व सलीम-अनारकली… या सगळ्यात अबोल प्रेमाची अजरामर प्रेमकथा होती ती म्हणजे ‘रमा माधव’ची.
रमा माधव यांच्या प्रेमाला अल्पायुष्य मिळालं तरी ते पूर्णत्वाला गेलं. ‘रमा माधव’ म्हटलं कि कित्येक वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांनी स्वामी मालिकेत साकारलेल्या अविस्मरणीय भूमिकांचे स्मरण होतं. तेव्हा रमाबाई साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आगामी ‘रमा माधव’ या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात दुसरं दमदार पाऊल टाकताहेत. विशेष म्हणजे त्या काळची रमाबाई व माधवराव पेशव्यांची भूमिका साकारणारी मृणाल कुलकर्णी व रवींद्र मंकणीची सुपरहिट जोडी या सिनेमात नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाईची भूमिका साकारताहेत. मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार असलेला ‘शिवम जेमिन एंटरप्राइज प्रा. लि.’ प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय.
ऐतिहासिक कथानक, विविधरंगी व्यक्तिरेखा, अनुभवी स्टारकास्ट, ख्यातनाम तंत्रज्ञ, भव्य सेटअप, मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन असलेल्या ‘रमा माधव’ चित्रपटात रमाबाई आणि माधवराव यांच्या सहजीवनाची अजरामर प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘रमा माधव’ ८ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

Story img Loader