एखाद्या विषयाची प्रहसनात्मक मांडणी चित्रपट रूपात अनुभवण्याचा योग फार कमी वेळा येतो. विंडबनात्मक पद्धतीचे आणि तार्किकता बाजूला सारून केलेले विनोदी चित्रपट अधिक वाट्याला येतात. प्रहसनात्मक नाट्य रंगवतानाही अतिशयोक्तीचाच मामला अधिक असला, तरी अतिशय हुशारीने आपल्याला आवश्यक त्या विषयांचे संदर्भ अचूक पेरत केलेला विनोद अधिक प्रभावी ठरतो. १९४२ च्या काळाचा संदर्भ घेत भारतातील वर्तमान परिस्थिती, जगभरात छेडलं गेलेलं दुसरं महायुद्ध आणि त्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या एका छोट्याशा गावात झालेला हलकल्लोळ याची रंगतदार मांडणी असलेला ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा प्रहसननाट्याचा मस्त जमून आलेला चित्रप्रयोग आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट खरोखरच एक नवा प्रयोग म्हणता येईल. दोन दशकांपूर्वी रंगभूमीवर ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक मोकाशींनी सादर केलं होतं. याच नाटकावरून प्रेरित चित्रपट सादर करताना त्यातील मूळ विषयाला धक्का न लावता, त्याचे चित्रपटात माध्यमांतर केले आहे. चित्रपटाची सुरुवात करताना अगदी काही सेकंदांसाठी का होईना निवेदनात्मक पद्धतीने विषयाला हात घालण्याची शैली इथेही वापरली आहे. १९४२ च्या काळातील ही गोष्ट आहे. भारतात गांधीजींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला आहे. स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आहे. तर जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत आहेत. जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलर आणि त्याला आव्हान देणारे ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल, दोन्ही देशात सुरू असलेली हेरगिरी असे संदर्भ देत चित्रपट थेट कोकणात पोहोचतो आणि इथून पुढे गमतीशीर नाट्याला सुरुवात होते. कोकणातल्या बोंबिलवाडी गावात वरवंटे नामक सद्गृहस्थ, त्यांची पत्नी आणि गावकरी नाटकाची तालीम करत आहेत. नाटक सादर व्हायची वेळ झाली तरी ते अजून नीट बसलेले नाही. एकीकडे वरवंटे नाटकाचा गोंधळ निस्तरण्यात मग्न आहेत, दुसरीकडे ब्रिटिश अधिकारी कुक गावात कोणी स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करत नाही ना म्हणून जरब बसवण्याच्या प्रयत्नात आहे. या सगळ्या गोंधळात भलतंच काहीतरी घडतं आणि चक्क वरवंटेंच्या नाटकात हिटलरचा प्रवेश होतो. तिथून पुढे बोंबिलवाडीत काय नाट्य रंगतं हे पडद्यावरच अनुभवायला हवं. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटाची आटोपशीर मांडणी आणि कथानक सतत खेळवत ठेवण्याची शैली यामुळे कथेचा जीव लहान असला तरी चित्रपट कुठेही कंटाळवाणा झालेला नाही. प्रहसनात्मक मांडणी असल्याने कुठेही चित्रपट पाहताना आपल्याला विचार करत डोक्याला ताण द्यावा लागत नाही. एक छोटासा अशक्यप्राय वाटणारा प्रसंग केंद्रस्थानी घेऊन त्यातून होणारी गंमतजंमत अतिरंजक पद्धतीने मांडताना दिग्दर्शकाने त्याला विनाकारण कुठेही फाटे फोडलेले नाहीत. मुळात नाटकाचे चित्रपट स्वरूपात माध्यमांतर करताना अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ नाटकात तर हिटलरची व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे, त्यामुळे त्यात विन्स्टन चर्चिल, हिटलरचे कार्यालय, त्यांचे सहकारी, प्रेयसी या सगळ्या गोष्टी संदर्भापुरत्या का होईना आहेत. पुन्हा तिथेही नाटकात एक वेगळं नाटक घडतं आहे, अशा पद्धतीने खुलत जाणारी कथा आहे. कथेचा हा सगळा व्याप नाटकात प्रतीकात्मक पद्धतीने रंगमंचीय अवकाशात बसवला जातो, तेव्हा प्रेक्षकांचा सहजतेने त्यावर विश्वास बसतो. चित्रपटात मात्र या गोष्टी प्रत्यक्षात दिसाव्या लागतात. इथे अवकाशही मोठा आहे आणि तंत्राच्या साहाय्याने जर्मनीत काय कुठेही चित्रीकरण करणं शक्य आहे. मात्र, तसं न करता त्यातल्या प्रहसनावर अधिक भर देत चित्रपट माध्यमाचा अधिकाधिक प्रभावी पद्धतीने वापर कसा करता येईल या विचाराने मोकाशी यांनी केलेली मांडणी लक्षात येते. त्यामुळे अवकाश मोठा असला तरीही दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी चित्रपटात हे कथानक खुलवतानाही काहीएक आकृतिबंध योजलेला आहे. इथे कॅमेरासमोर दिसणाऱ्या पात्रांच्या हालचाली, त्यांचा भवताल, त्यांच्या साद-प्रतिसादातून घडणारं नाट्य यावर अधिक केंद्रित झाला आहे.
हेही वाचा >>>बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पणवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”
या मर्यादित अवकाशात कथा खुलवण्याची जबाबदारी विनोदी अभिनयात हुकमी एक्के असलेल्या कलाकारांनी सहजी पेलली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी साकारलेला हिटलर खरोखरच कथेत गंमत आणतो. त्यांना चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळेंनी उत्तम साथ दिली आहे. खरंतर या दोघांमधली जुगलबंदी हेच महत्त्वाचं नाट्य असेल असा भास ट्रेलर पाहिल्यावर होतो. त्याबाबतीत चित्रपट निराशा करतो. इथे चर्चिल यांच्या पात्राला पुरेसा वाव मिळालेला नाही. त्या तुलनेत वरवंटे आणि त्यांचे नाटकातील सहकारी यांनी हिटलर आणि कुकच्या मदतीने खरी गंमत वाढवली आहे. वैभव मांगले यांनी साकारलेले वरवंटे, त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी आणि नाटकातल्या व्यक्तिरेखा म्हणून रितिका श्रोत्री, मनमीत पेम यांच्यातील प्रसंग अधिक रंगतदार झाले आहेत. मनमीत आणि प्रशांत दामले यांची एका प्रसंगातील जुगलबंदीही मस्त जमून आली आहे. नाटक हा प्रकार शब्दबहुल असतो, इथे चित्रपटाला शब्दबंबाळ न करताही हलक्याफुलक्या संवादांनी कथा पुढे नेली आहे. अर्थात, मांडणीतला प्रयोग यशस्वी ठरला असला तरी कथेच्या पातळीवर आजच्या काळाला अनुसरून लेखक म्हणून परेश मोकाशी यांनी काही नवं जोडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट आशयघनतेच्या बाबतीतही वेगळी उंची गाठू शकला असता. मनोरंजनाच्या बाबतीत मात्र बोंबिलवाडीचा प्रयोग कुठेही कमी पडलेला नाही.
मु. पो. बोंबिलवाडी
दिग्दर्शक – परेश मोकाशी, कलाकार – प्रशांत दामले, आनंद इंगळे, दीप्ती लेले, अद्वैत दादरकर, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, सुनील अभ्यंकर, राजेश मापुस्कर, गणेश मयेकर.