मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्याच्या घडीला नवनवीन चेहरे प्रकाशझोतात येत आहे. आतापर्यंत अनेक नोवदित कलाकारांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून या नवोदित कलाकारांच्या यादीत आणखी एक नवं नाव जोडलं गेलं आहे. ‘सावट’ या आगामी चित्रपटातून श्वेतांबरी घुटे ही नवोदित अभिनेत्री चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेतांबरी घुटेने आतापर्यंत वेगवेगळ्या लघुपट, अल्बम आणि जाहिरातींमध्ये काम केलं असून ‘सावट’ या चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये श्वेतांबरी ‘अधीरा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. “लघुपट आणि जाहिरातींमधून काम करायला सुरुवात केली होती. मात्र एखाद्या चांगल्या व्यावसायिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती. हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, शोबिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ या चित्रपटातून ही इच्छा पूर्ण झाली आहे. सस्पेन्सचा रंग असलेली माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्की भावेल”, असं श्वेतांबरी म्हणाली.

दक्षिणेतल्या अनेक लघुपट व जाहिरांतीसाठी श्वेतांबरी हिने काम केले आहे. अनेक महोत्सवांमध्ये पाठवलेल्या गिरीश जांभळीकर यांच्या ‘अनटायटलड साऊंडक्लिप’ सारख्या लघुपटांचा समावेश आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ मालिकेत व ‘घोर अंधेरा’ या अल्बममध्येही तिने काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie savvat new actress entry