नुकताच प्रदर्शित झालेला इन्व्हेस्टमेंट हा मराठी सिनेमा फाईव्ह डी कॅमेऱ्यावर चित्रित करण्यात आला असं आवर्जुन सांगितलं जात आहे. त्यानिमित्त कॅमेरा तंत्रज्ञानातील बदलानं सिनेमा क्षेत्र कसं बदलतं आहे, याबद्दल या सिनेमाचे सहदिग्दर्शक तसंच सिनेमॅटोग्राफर यांनी केलेलं विवेचन-
साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी महत्त्वाच्या असतात, तसंच त्यांचं विशिष्ट प्रकारचं असणं हे एकमेकांशी जोडलेलंदेखील असतं. चित्रपटनिर्मितीसंदर्भात आज हे विधान आणि त्यामागचा विचार याला विशेष महत्त्व आलंय, असं म्हणावं लागेल. आज म्हणजे गेली चार-पाच र्वष. त्यापूर्वी आपल्याकडे चित्रपट म्हटला की एकच पद्धत होती. फिल्मचे डब्यांवर डबे, ती रिळं चालवण्यासाठी लागणारे अवजड कॅमेरे, प्रकाशयोजनेसारख्या गोष्टीला येणारं प्रमाणाबाहेर महत्त्व आणि रंगभूषेसारख्या त्या मानाने दुय्यम (बहुतेक चित्रपटात दुय्यम) गोष्टीलाही मिळणारं प्रमुख स्थान. हे सारं सांभाळू शकणारं मोठं युनिट आणि दिवसागणिक वाढत जाणारे खर्चाचे आकडे यातलं सारं अत्यावश्यक असतं अशातला भाग नाही. देशोदेशीच्या मोठय़ा चित्रपट चळवळी पाहिल्या तर आपल्याला हे साधनांचं अवडंबर टाळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शक्य तितके लहान कॅमेरे, मर्यादित क्रू, कृत्रिम प्रकाशयोजनांना पर्याय म्हणून नसíगक प्रकाशाला वापरणं अशा बऱ्याच गोष्टी जगभरचे चित्रकत्रे वेळोवेळी करताना दिसतात. मात्र तो भाग चळवळीचा. रूढ प्रेक्षकप्रिय चित्रपट हा आपला ठराविक साचा बदलायला तयार नसतो.
तो का नसतो, या चच्रेत पडण्यात मुद्दा नाही. मात्र त्याचा परिणाम हा की चित्रपट हे माध्यम प्रामुख्याने कलावस्तू म्हणून किंवा आशयाला प्राधान्य देऊन चित्रपट करू पाहणाऱ्यांसाठी बाद होतं. प्रचंड खर्च आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा मग कोणत्याही प्रोजेक्टचा भाग बनतो.
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये आपल्याकडे या साधन वर्चस्वाला एक पर्याय उपलब्ध झाला. डिजिटल फिल्ममेकिंग हा शब्दप्रयोग आपल्याला खूपच परिचित आहे. तपशील माहीत नसला तरी कानावर पडलेला आहे. सध्या जागतिक चित्र पाहिलं तर चित्रपटाला समानार्थी मानली जाणारी फिल्म चित्रपटांतून रजा घेण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे जगभरातच तंत्रज्ञानात फरक पडताना दिसतोय. कॅमेऱ्यांमध्ये होणारा बदल हा त्यातलाच एक भाग म्हणता येईल. या बदलाचा फायदा आपल्याकडे छोटेखानी निर्मिती करू पाहणाऱ्या चित्रपटांकडे मसालेदार व्यावसायिक आणि हिशेबी निर्मिती म्हणून न पाहता व्यक्तिगत आविष्कार म्हणून पाहणाऱ्या दिग्दर्शकांना मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.
आपल्याकडे कॅननचा सेव्हन- डी कॅमेरा आल्याला चार-पाच र्वष झाली. वारीची पाश्र्वभूमी असणारा मराठी चित्रपट ‘गजर’ आणि निश्चित संहितेपेक्षा वर्कशॉप फिल्मसारखा असलेला ‘स्टॅनली का डब्बा’ या सेव्हन- डीवर चित्रित केलेल्या चित्रपटांनी (या दोन्ही चित्रपटांचे चित्रण या लेखाचे सहलेखक अमोल गोळे यांनी केले आहे.) आपलं या नव्या माध्यमाकडे आणि त्याहीपेक्षा त्यातून तयार झालेल्या निर्मितीच्या नव्या शक्यतांकडे पहिल्यांदा लक्ष वेधलं. ‘डब्बा’च्या वितरणात ट्वेन्टीएथ सेंचुरी फॉक्ससारख्या जागतिक संस्थेने दाखवलेला रस हा या माध्यमाला खऱ्या अर्थाने प्रस्थापित करून गेला म्हटलं तर ते योग्य ठरेल.
सेव्हन- डीला चित्रपटाच्या मोठय़ा पडद्यावर चालेलशा दर्जाचं चित्रीकरण शक्य ठरवणारा आणि थोडक्या गरजांमध्ये चित्रपट बनवण्याची शक्यता उपलब्ध करून देणारा नव्या अद्ययावत कॅमेऱ्यांमधला एक म्हणता येईल. त्यानंतरचा फाइव्ह डी आणि आता वापरण्यात येणारा वन -डीसी हे अधिक सुधारित स्वरूपात दाखल झाले आणि नव्या चित्रकर्त्यांमध्ये थोडं उत्साहाचं वातावरण पसरलं.
या कॅमेऱ्यांचं हलकं वजन, त्यांच्यात असणाऱ्या कमी प्रकाशात छायाचित्रण करण्याच्या शक्यता, त्यांच्या फूटेजचा (फूटेज हा शब्दही आपल्या जुन्या ‘फिल्मी’ भाषेशी जोडलेला, आता कदाचित फिल्मच्या गरहजेरीत तयार होणाऱ्या नव्या भाषेमधून त्याचीही हकालपट्टी होऊ शकते.) दर्जा, यातून छायाचित्रणाचा पसारा आटोक्यात आला. ज्यांना वास्तववादी पद्धतीचं काम करायचंय त्यांना ते शक्य व्हायला लागलं. पूर्वीसारखं तासन्तास चालणारं लायटिंग अन् आपल्या शॉटसाठी ताटकळत बसलेली नटमंडळीं हे दृश्य दिसेनासं झालं. दिग्दर्शक आणि नट यांच्या डोक्यावरलं तंत्रज्ञानाचं नियंत्रण आटोक्यात आलं आणि त्यांना अधिक मोकळेपणी काम करता यायला लागलं.
केवळ फिल्म विरुद्ध डिजिटल अशी यादी करायची तर ती खूपच मोठी होईल. कारण हे तंत्रज्ञान खूप पलू असलेलं आहे आणि हे पलू वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रशैलीला उपयुक्त ठरू शकतात. उदाहरणार्थ रेडचा एपिक किंवा अॅरीचा अॅलेक्सा हेदेखील डिजिटल कॅमेरे असले आणि हल्ली आपल्याकडे कायम वापरले जात असले तरी ज्याप्रमाणे वन -डीसी पसारा कमी करेल तसे ते करणार नाहीत. मात्र त्यांचे फायदे हे वेगळ्या प्रकारचे आहेत. इमेज कॅप्चर आणि इमेज मॅनिप्युलेशन यासाठी त्या त्या कॅमेऱ्याचा वेगवेगळा फायदा असतो आणि वेगवेगळी वैशिष्टय़े असतात. ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटासाठी हे तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तेव्हा आमच्यापुढे फायदे होते ते असे.
‘इन्व्हेस्टमेंट’ची पाश्र्वभूमी ही पूर्णपणे वास्तववादी आहे. घडणाऱ्या घटनांमध्ये नाटय़पूर्ण मांडणी जरूर आहे, पण या नाटय़पूर्णतेने प्रेक्षकाला कथा केवळ कल्पनाविलास न वाटणं हे महत्त्वाचं. कथेचा रोख हा आजच्या सामाजिक बदलांशी जोडलेला आहे, जे एका परीने आजचं वास्तवच आहे. यामुळे स्थळांची निवड करताना कुठेही कृत्रिम वाटेल, मुद्दाम लावलेलं नेपथ्य वाटेल असं काही करायचं नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे घोरपडे कुटुंबाचा उच्च मध्यमवर्गीय उपनगरी वस्तीतला फ्लॅट या पटकथेतल्या मध्यवर्ती लोकेशनपासून स्मशान किंवा शाळा अशा अनेक जागा प्रत्यक्ष असतात तशा वापरायच्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा