अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘फड लागलाय’ असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्यात ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत पाहायला मिळत आहे.

संगीत हे भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम मानलं जातं. या संगीतातून जर एखादी कथा पुढे जात असेल तर? संगीतप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरेल. असाच संगीत नजराणा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव सज्ज झाले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’या चित्रपटातील ‘फड लागलाय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे. तर अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे तर क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!

सोनाली कुलकर्णीने लंडनच्या टॉवर ब्रीजवर केला गरबा, व्हिडीओ व्हायरल

‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीवर चित्रीत या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

‘तमाशा लाईव्ह’ची सर्वच गाणी उत्तम आहेत. मला याचा फार आनंद होत आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली की, एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची गाणी मी या चित्रपटात लिहली आहेत. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.” अशी प्रतिक्रिया गीतकार क्षितीज पटवर्धन यांनी दिली आहे.

‘तमाशा लाईव्ह’मधील आणखी एक गाणे प्रदर्शित, सिद्धार्थ जाधव बनला गायक

मुख्य म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे पहिल्यांदा ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत याने या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader