प्रदर्शनापूर्वी नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाममध्ये ठसा उमटवलेला ‘टपाल’ हा मराठी चित्रपट २६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. ‘मैत्रेय’ समूहाने ‘मैत्रेय मास मीडिया’च्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदी चित्रपटातील सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वर्षां मधुसूदन सत्पाळकर या निर्मात्या आहेत. या चित्रपटातून पोस्टमन, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे भावविश्व साकारण्यात आले आहे.
या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर दक्षिण कोरियातील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आला होता. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री वीणा जामकर यांना दक्षिण आफ्रिकेत ‘इफ्सा’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. चित्रपटाची कथा, पटकथा मंगेश हाडवळे यांची असून नंदू माधव, वीणा जामकर, उर्मिला कानेटकर, गंगा गोगावले, जयवंत वाडकर, बालकलाकार रोहित उतेकर हे कलाकार आहेत. अभिनेते आणि मैत्रेय मास मिडियाचे संचालक मिलिंद गुणाजी चित्रपटात एका विशेष भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना सामाजिक आशयाचा आणि चांगली कथा असलेला चित्रपट देण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचे वर्षां मधुसूदन सत्पाळकर यांनी सांगितले. तर मराठीत सामाजिक आशय असलेले आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. ‘टपाल’ हा चित्रपट या दोन्हीतील दरी भरून काढेल, असे मत मंगेश हाडवळे व लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा