तुम्हाला वळू हा सिनेमा आठतोय का? वळू सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील घरात ओळखीचा झालेल्या त्या सिनेमातील बैलाचा मृत्यू झाला आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या ‘वळू’ सिनेमात या बैलाची ‘डुरक्या’ नावाची भूमिका होती. सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत राजा नावाने हा बैल ओळखल्या जाणाऱ्या या राजाने याच संस्थेत अखेरचा श्वास घेतला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ सिनेमातील डुरक्या या बैलाचे पात्र तुफान लोकप्रिय झाले होते. या बैलाच्या जोरावर या सिनेमाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अने पुरस्कार मिळवले होते.

अन् पंडित अभिषेकी एकाएकी गायब झाले- अशोक पत्की

तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील होता. तब्बल तीनशे वळूंमधून दिग्दर्शकाने राजाची निवड केली होती. मागील काही वर्षांपासून त्याची सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत देखभाल केली जात होती. अनेक गाई, वासरे यांच्यासह काही भाकड जनावरासोबत तो या संस्थेत राहत होता. मात्र, आजारपणामळे वृद्ध झाल्याने या बैलाचे निधन झाले.

१७-१८ वर्षे गाठलेल्या या वळूने मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे खाणे-पिणे सोडले होते. यामुळे त्याचे वजन दोनशे किलोंपर्यंत घटले होते. राजा वृद्ध झाल्याने उपचारास हवी तशी साथ मिळत नव्हती आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली. पांजरपोळ संस्थेत गरजणारा भारदस्त आवाज हरपला. या संस्थेचे या बैलावरील प्रेम त्याच्या मरणानंतरही कमी झाले नाही. म्हणून तर या संस्थेने राजाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात अतुल कुलकर्णी, मोहन आघाशे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Story img Loader