रुपेरी पडद्यावरील वैविध्यपूर्ण मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच मनापासून दाद दिली आहे. ‘वाल्या टू वाल्मिकी’ हा असाच एक वेगळ्या आशयाचा चित्रपट निर्माते श्रीकांत शेणॅाय व कार्यकारी निर्मात्या शुभांगी शेणॅाय घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कर्जतयेथे संपन्न झाला. विचित्र परिस्थितीत अडकलेल्या माऊली या मुलाची ही कथा आहे. माऊलीच्या प्रवासात त्याला अनेकजण भेटतात. या सगळ्यांमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. या कलाटणीमुळे माऊलीच्या आयुष्याला दिशा मिळणार की तो दिशाहीन होऊन भरकटत जाणार? याची भावस्पर्शी कथा ‘वाल्या टू वाल्मिकी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाची कथा व संवाद मनिष कदम यांचे असून गीते प्रवीण दामले यांची आहेत, तर संगीत अश्विन भंडारे यांनी दिले आहे. गायक आदर्श शिंदे व अश्विन भंडारे यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत. वर्णन पिक्चर्स बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण राज रेवणकर यांनी केले आहे. चित्रपटात मिलिंद शिंदे, संजय खापरे पंकज विष्णू, मौसमी तोंडवळकर, संजय कसबेकर, मास्टर वरुण दामोदर बाळीगा यांच्या भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा