आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळवून नवा इतिहास निर्माण केला होता. मध्यंतरीचा काही काळ सोडला तर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीला फारसे स्थान नव्हते. पण, २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराचे दरवाजे पुन्हा उघडून दिले आणि मराठी चित्रपटांना नवा ‘श्वास’ मिळाला. गेले काही वर्ष जोगवा, बाबू बँड बाजा, धग आणि फँड्री, येलोसारख्या चित्रपटांनी सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारत मराठीचा झेंडा फडकवत ठेवला आहे.
‘श्वास’ प्रदर्शित होईपर्यंत मराठी चित्रपट विनोदी, ग्रामीण आणि तमाशापट अशा चाकोरीत अडकलेले होते. चाकोरीत अडकलेल्या मराठी चित्रपटांना ‘श्वास’च्या निमित्ताने वेगळा विषय मिळाला. प्रेक्षकानीही ‘श्वास’चे भरभरून स्वागत केले. त्यानंतर आलेल्या मराठी चित्रपटांनी विषयातील वैविध्यता आणि अन्य बाबींमध्ये बाजी मारत राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा आपले वेगळेपणे सिद्ध करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक मराठी चित्रपटांनी अभिनय, संगीत, दिग्दर्शन, पाश्र्वगायन अशा विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवून या पुरस्कारांवर आपली मराठी मोहर उमटविली आहे.
मराठी चित्रपटांचा नवा ‘श्वास’!
आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळवून नवा इतिहास निर्माण केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-04-2014 at 06:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movies got national award for his multi topic story