पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील सोळा वर्षांपूर्वीच्या आमच्या बॅचचे आम्ही विद्यार्थी खूप वर्षांनी एकमेकांना भेटायचं ठरवत होतो. इतक्या वर्षांनी होणारी आमची ही पुनर्भेट.. स्नेहमीलन म्हणजे सर्वानी एकत्र भेटायचं, गप्पाटप्पा करायच्या, खायचं-प्यायचं इतकंच करायचं का, हा विचारही त्याचवेळी मनात आला. असं तर सगळेच करतात. आपणही तेच करायचं? यापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं असं आम्हाला वाटत होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ललित कला केंद्रात नाटय़शास्त्राचे विद्यार्थी असताना आम्ही तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ नाटक केलं होतं. नाटकाच्या प्रचंड पॅशनच्या धुनकीत सादर केलेला तो प्रयोग जाणकारांसह सर्वानाच आवडला होता. खरं तर तेव्हा आम्हाला ते नाटक किती कळलं होतं याबद्दल मला शंका आहे. कारण आम्ही तेव्हा धड १८ वर्षांचेही नव्हतो. तशात हे एका बोल्ड विषयावरचं नाटक. पण ज्या पॅशनने आम्ही ते केलं त्यामुळे बहुधा पाहणाऱ्यांना ते भावलं असावं. विद्यार्थ्यांची नाटय़निर्मिती असलेल्या या प्रयोगाचं दिग्दर्शन केलं होतं जयंत जठार याने. मी त्यात चंपाची भूमिका केली होती. तर हिमानी पाध्येनं लक्ष्मी साकारली होती. संदीप पाठक सखाराम बाइंडर झाला होता. दीपक भागवतने दाऊदची भूमिका वठवली होती. आमच्या या पुनर्भेटीच्या निमित्तानं पुनश्च ‘सखाराम’चा प्रयोग सादर केला तर..? आज बरेच उन्हाळे-पावसाळे अनुभवल्यानंतर हे नाटक सादर करताना आम्हाला काय अनुभव येतो, हे जाणून घ्यायची उत्सुकताही होतीच. सगळ्यांनीच ही कल्पना उचलून धरली. त्याच संचात हे नाटक करायचं ठरलं.
पण मुख्य अडचण ही होती, की ‘सखाराम’चे हक्क गार्गी फुले हिने घेतले होते. तिला ते करायचं होतं. गंमत म्हणजे तिने मलाच चंपाची भूमिका ऑफर केली होती. पण मला तेव्हा त्यात काम करणं शक्य नसल्यानं मी नकार दिला होता. आता ‘सखाराम’चे पाच (का होईनात!) प्रयोग करायचे म्हटल्यावर ते करण्यासाठी गार्गी आणि तेंडुलकरांच्या मुलीची परवानगी मिळणं गरजेचं होतं. मी गार्गीला विनंती केली. आणि तिनंही मोठय़ा मनानं आम्हाला परवानगी दिली.
अर्थात आणखीही एक मोठीच अडचण होती. त्यावेळी आमच्या ‘सखाराम’मध्ये लक्ष्मी साकारणारी हिमानी पाध्ये आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. तिलाही ही कल्पना आवडली. तिलाही या प्रयोगात सहभागी व्हायचं होतं. तेव्हा ती भारतात येईल त्यावेळी हे प्रयोग करायचं आम्ही ठरवलं. त्यानुसार गेले सहा-सात महिने आम्ही तिच्या तसंच आमच्या सोयीनुसार रात्री-बेरात्री ऑनलाइन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाटकाचं वाचन, प्रवेश बसवणं वगैरे नाटकाची पूर्वतयारी सुरू केली. आम्ही सारेच सिनेमा, नाटक, मालिका आदी आपापल्या व्यापांत अडकलेलो असल्यामुळे जसा वेळ मिळेल तसं आमच्यापैकी कुणाच्या तरी घरी जमेल तशा तालमी करू लागलो. काही दिवसांपूर्वी हिमानी आम्हाला जॉइन झाली. तेव्हाच्या प्रयोगात दाऊदची भूमिका करणारा दीपक भागवत मात्र काही अडचणींमुळे यात सहभागी होऊ शकत नव्हता. त्याच्या जागी सुहास शिरसाट यांना घेतलं. आमच्या या आगळ्या प्रयोगाबद्दल कळल्यावर ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थीही मदतीला आले. ‘सखाराम’चे फक्त पाचच प्रयोग आम्ही करणार होतो. तीन मुंबईत व दोन पुण्यात. ‘स्वान्त सुखाय’ आम्ही ते करणार असल्यानं त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला. गेली कित्येक वर्षे आम्ही सारेच नाटकाशी संबंधित असल्याने बॅकस्टेज आर्टिस्टस्ची परिस्थिती जवळून पाहतो आहोत. त्यांना पुरेसं उत्पन्न मिळत नाही. जे मिळतं, त्यात ते कशीबशी गुजराण करतात. तेव्हा या निमित्तानं प्रयोगांतून मिळणारं उत्पन्न बॅकस्टेज आर्टिस्टना द्यायचं असं आम्ही ठरवलं.
नाटकाचे फक्त पाच प्रयोग होणार असल्यानं निर्मितीखर्च आटोक्यात ठेवणं गरजेचं होतं. अर्थात त्याच्या निर्मितीमूल्यांत कसलीच तडजोड करायची नाही, हेही ठरलं होतं. आम्ही कुणी मानधन घेणार नव्हतो. आमच्या ‘कोडमंत्र’च्या बॅकस्टेज आर्टिस्टनीही सहकार्याचा हात पुढे केला. संगीतकार राहुल रानडे आणि नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांनीही पैशांचा विचार न करता सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. तालमींकरता सांस्कृतिक संचालक संजय कृष्णाजी पाटील, अजय कासुर्डे, अंजली अंबेकर, कौस्तुभ दिवाण, सेवा मोरे, जयश्री जगताप, उमेश जगताप, विनायक कावळे अशा अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. याखेरीज आम्हा कलाकारांच्या घरच्यांनीही तालमींदरम्यान खाऊपिऊ घालण्याची जबाबदारी स्वयंत्स्फूर्तीनं उचलली.
आता प्रयोगाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ९, १० आणि ११ फेब्रुवारीला मुंबईत, तसंच १२ व १३ फेब्रुवारीला पुण्यात ‘सखाराम’चे प्रयोग होणार आहेत. ऑनलाइन बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आमचा हुरुप आणखीन वाढला आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास दरवर्षी अशाच प्रकारे पूर्वी गाजलेल्या काही नाटकांचे मोजके प्रयोग करायचं मनात आहे. अर्थात या साऱ्या पुढच्या गोष्टी! सध्या मात्र आमचं सगळं लक्ष केंद्रित झालंय ते ऑपरेशन ‘सखाराम’वर!
मुक्ता बर्वे