नमिता धुरी
नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. हॉकीच्या पुरुष आणि महिला संघानेही इतिहास घडवला. या अशा प्रकारच्या विजयानंतर प्रत्येक भारतीयाच्या ओठावर असलेलं वाक्य होतं ‘चक दे इंडिया!’ लाखो भारतीयांची देशभावना या एकाच वाक्यातून व्यक्त होण्यासाठी कारणीभूत आहे काही वर्षांपूर्वी आलेला ‘चक दे इंडिया’ हा हिंदी सिनेमा. भारताविरुद्ध कोणताही शत्रू उभा न करता, कोणत्याही युद्धाची कथा न सांगताही या सिनेमाने हॉकी या राष्ट्रीय खेळाच्या माध्यमातून भारतीयांच्या देशभावनेला हात घातला.

हॉकीतल्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा सांगणारा ‘गोल्ड’, पहिल्या अणुबॉम्ब चाचणीचे कथानक मांडणारा ‘परमाणु’, इस्रोच्या यशस्वी अवकाश मोहिमेवर आधारित ‘मंगलयान’ अशा सिनेमांनी भारतीय अस्मितेचे भावनिक आवाहन प्रेक्षकांसमोर उभे केले आणि त्यांना चित्रपटगृहांकडे खेचून आणले. दुसऱ्या बाजूला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द गाझी अटॅक’, ‘केसरी’ यांसारख्या हिंदी सिनेमांमधल्या युद्धभूमीवरच्या लष्करी कारवाया, तर देशाभिमानी तरुण प्रेक्षकांचे रक्त सळसळवतात. एकूणच संरक्षण दलांविषयी प्रेक्षकांच्या मनात विश्वास निर्माण करतात. ‘राझी’सारख्या सिनेमाने युद्धापलीकडच्या नायकांची ओळख प्रेक्षकांना करून दिली. अशा प्रकारे प्रेक्षकांची देशभावना जागृत करून चित्रपटगृह दणाणून सोडण्याची किमया हिंदी चित्रपट साधत असताना या पटलावर मराठी चित्रपट कुठे आहे? अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात बदललेल्या मराठी चित्रपटांत असे विषय फारसे हाताळले गेले नाहीत. हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटांनी सामाजिक आशय खूप जपला, मोठा केला. शहरी प्रेक्षकांमध्येही सामाजिक भान जागवले; मात्र यामुळे मराठी सिनेमाची ओळख प्रादेशिक सिनेमाच्या चौकटीत अडकली आहे. चरित्रपटांपेक्षा ऐतिहासिक सिनेमांना रंजनमूल्य अधिक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हा मराठी चित्रपटकर्मीचा आवडीचा विषय ठरतो. ‘मराठा तितुका मेळवावा’पासून ते ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’ इत्यादी ऐतिहासिक चित्रपटांनी देशभावनेला भरपूर जागा दिली. ‘मराठी सिनेमांची देशभक्ती शिवाजी महाराजांपुरतीच मर्यादित आहे का’, या प्रश्नाला उत्तर म्हणून ‘लोकमान्य – एक युगपुरुष’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘क्रांतिवीर राजगुरू’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांसारखे काही देशभक्तीपर सिनेमांचे प्रयोगही अलीकडच्या काळात झाले. यातील नायकांचे कार्य देशपातळीवरील नक्कीच आहे; पण यातील सर्वच नायक केवळ मराठी मातीतले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी सिनेमाला प्रादेशिकतेचे कुंपण आले. मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग वाढवायचा असेल, अमराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांकडे वळवायचे असेल तर देशपातळीवरचे विषय मराठी चित्रपटांत येणे आवश्यक आहे. आतापर्यंत तसे का झाले नाही याची उत्तरे अनेक आहेत आणि ती समजून घेणेही आवश्यक आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीपर चित्रपट बनत असत, कारण लोकांच्या मनात या विषयाला प्रमुख स्थान होते; पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात मनोरंजनाला अधिक महत्त्व आले आणि आपल्याकडे कौटुंबिक जिव्हाळ्याचे, भावनानाटय़ाला महत्त्व असलेले चित्रपट बनत राहिले. केवळ देशभक्तीपरच नाही, पण इतर कोणत्याही चित्रपट प्रकारात बसणारे चित्रपट येणे कमी झाले, असे निरीक्षण सिनेअभ्यासक गणेश मतकरी यांनी नोंदवले. अगदी आत्ताच्या काळातील शिवकालीन कथानकांवर आधारित ऐतिहासिक चित्रपट पूर्ण राष्ट्राबद्दल बोलत नसले तरी त्यातून राष्ट्रभावना व्यक्त होते. मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा क्रांतिकारकांच्या कथा यायला लागल्या आहेत आणि हेच चित्र मराठी चित्रपटांत येत्या काही वर्षांत दिसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठीत देशभक्तीपर चित्रपट कमी असण्याचा संबंध अर्थकारणाशी अधिक आहे. बंड, क्रांती, स्वातंत्र्यलढा दाखवायचा तर तो काळ उभा करावा लागतो, विषयाचा आवाका वाढतो, भव्यता वाढते. हिंदी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग संपूर्ण देशभरात आहे. शिवाय ठरावीक कलाकारांचे चेहरे बघण्यासाठी चित्रपटगृहात येणारा प्रेक्षकवर्गही हिंदीला मिळतो. हिंदीत तयार झालेले बहुतांश देशभक्तीपर सिनेमे ठरावीक चेहऱ्यांना घेऊनच तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे निर्मिती खर्च वसूल होण्याची शाश्वती हिंदी सिनेनिर्मात्यांना असते. याउलट, मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. सशक्त आशयाची खात्री असेल तरच मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतो. इथे पुन्हा आर्थिक प्रश्नच आडवे येतात. एकदम मोठय़ा लढय़ांना न भिडता प्रातिनिधिक स्वरूपात विषय मांडणाऱ्या छोटय़ा कथा वा प्रतीकात्मक आशय मांडणारे चित्रपट करून पाहाणे, असा उपाय मतकरी यांनी सुचवला.

देशभक्तीपर सिनेमेच काय, पण विज्ञानकथांवर आधारित सिनेमे आणि सुपरहिरोंचे सिनेमेसुद्धा अद्याप मराठीत बनलेले नाहीत. यामागेही आर्थिक कारणेच आहेत. त्यामुळे मराठीत देशभक्तीपर सिनेमे का नाहीत, असा विचार करताना आजपासून काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमा कुठे होता आणि आज कुठे आहे याचा विचार करण्याची गरज अभिनेते, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी व्यक्त केली. मराठी सिनेमे प्रसिद्धीमध्ये हिंदी सिनेमांच्या तुलनेत किंचित मागे आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले; मात्र मराठी सिनेमा ज्या पद्धतीने वाटचाल करतो आहे ते पाहाता भविष्यात मराठीतही चांगले देशभक्तीपर सिनेमे येतील, अशी आशा चिन्मय यांनी व्यक्त केली.

२६/११ च्या हल्लय़ाची पार्श्वभूमी असलेला ‘हॅलो जय हिंद!’, स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्यावर आधारित ‘निळकंठ मास्तर’ आणि ‘वासुदेव बळवंत फडके’ असे तीन देशभक्तीपर सिनेमे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. हिंदीत बनणारे एकूण सिनेमे आणि त्यांतील देशभक्तीपर सिनेमे यांच्या प्रमाणाची तुलना मराठीत बनणारे एकूण सिनेमे आणि त्यांतील देशभक्तीपर सिनेमे यांच्या प्रमाणाशी केली तर गुणोत्तर सारखेच येईल, असेल अहिरे यांचे म्हणणे आहे. हिदींत जशी देशभक्तीपर सिनेमांची रांग लागते तशी मराठीत न लागण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे अलीकडचा मराठी सिनेमा कोणत्याही ठरावीक साच्यात अडकलेला नाही. नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग करत हळूहळू मराठी सिनेमा मोठा होतो आहे. त्यामुळे भविष्यात कधी तरी देशपातळीवरील विषय मराठी सिनेमात पुरेशा ताकदीने आणले जातील आणि मराठी प्रेक्षकांना त्यातही भव्यदिव्य मांडणीचा अनुभव घेता येईल, अशी आशा ठेवायला वाव नक्कीच आहे.