मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता घोषित करण्यात आली आहे. पुन्हा मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Photos : सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?, लंडनमध्ये थाटामाटात पार पडला कार्यक्रम

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Radhika Apte Movies on OTT (1)
मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्यात बोल्ड भूमिका, कुटुंबासह पाहता येणार नाहीत तिचे OTT वरील ‘हे’ सिनेमे

रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ आणि पर्पल बुल एंटरटेनमेंटने ‘टकाटक २’च्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. ‘टकाटक २’ कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट १९ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. शिवाय ‘टकाटक २’मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

‘टकाटक’च्या पहिल्या भागामध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले. तसेच या चित्रपटाची बरीच चर्चा रंगताना दिसली. अभिनेता प्रथमेश परब या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. आता दुसऱ्या भागातही प्रथमेश काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबरीने अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा – Photos : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने बांधलं घर, पाहा फोटो

‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’देखील मनोरंजनाच्या माध्यमातून एक सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. म्हणजेच गोव्याचं निसर्ग सौंदर्य आणि धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल. मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘टकाटक २’ला कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.