‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ या नाटय़संस्थांची निर्मिती असलेल्या ‘हसवाफसवी’ या दिलीप प्रभावळकर लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित पुनरुज्जीवित नाटकाचा ७५ वा अमृतमहोत्सवी प्रयोग रविवार, ८ जून रोजी दुपारी ४ वा. यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे सादर होत आहे.
पुष्कर श्रोत्री या हरहुन्नरी अभिनेत्याने दिलीप प्रभावळकर यांनी गाजविलेल्या यातील सहा वैविध्यपूर्ण भूमिकांचे आव्हान यशस्वीरीत्या पैलून दाखविले आहे. त्यांच्याखेरीज यात सतीश जोशी, वैखरी पाठक, संकेत सुभेदार यांच्याही भूमिका आहेत. मुंबईसह पुणे, मराठवाडा, विदर्भापासून पार दुबईपर्यंत पुष्कर श्रोत्रींच्या या ‘हसवाफसवी’ने रसिकांच्या पसंतीची दिलखुलास दाद मिळवली आहे. पुढील महिन्यात अहमदाबाद, बडोदा आणि गोव्यातही ‘हसवाफसवी’ला निमंत्रण आले आहे. निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांची निर्मित असलेल्या या नाटकाच्या यशात प्रदीप मुळ्ये यांचे कल्पक नेपथ्य, अजित परब यांचे पाश्र्वसंगीत आणि प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा यांचेही मोलाचे योगदान आहे.
‘हसवाफसवी’ची उद्या पंच्याहत्तरी!
‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ या नाटय़संस्थांची निर्मिती असलेल्या ‘हसवाफसवी’ या दिलीप प्रभावळकर लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित पुनरुज्जीवित नाटकाचा
First published on: 07-06-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi play hasva fasvi in matunga