‘मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना माहिती दिली.
“हे सत्य आहे की मी सगळ्यांचे पैसे देणं लागतो. पण शोमध्ये मला भयानक नुकसान सहन करावं लागलं आहे. मी स्वत: आता प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. मला कोणालाही फसवायचं नाही, कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत. मी सगळ्यांचे पैसे देईन. मला माहित आहे, माझ्याकडून खूप उशीर झालाय. पण मी सगळ्याचे पैसे नक्की देईन. परंतु, मला थोडा वेळ हवा आहे. अजून काम करुन मी सगळ्यांचे पैसे परत करेन हे नक्की”, असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “पैसे देण्याविषयी माझं कलाकारांशी बोलणंदेखील झालं आहे. काहींना मला पाठिंबा दिला आहे. परंतु, मी मज्जेत राहतोय आणि मला लोकांचे पैसे बुडवायचे आहेत असं काही नाहीये. मला खरंच खूप लॉस झाला आहे. त्यामुळे माझ्या हातात काहीच नाहीये. पण मी सगळ्याचे पैसे देईन हे नक्की. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय, त्यामुळे आमच्या कोणाच्याही नात्यात वितुष्ट येणार नाही. आम्ही इतकी वर्ष एकत्र काम केलंय त्यामुळे ते सगळे मला समजून घेतील ही खात्री आहे. दरवेळी त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. यावेळीदेखील देतील. कारण, माझा कोणताच चुकीचा हेतू नाही. मला कोणाला फसवायचं नाही किंवा यातून पळवाटही काढायची नाहीये.”
वाचा : ‘होणार सून…’फेम मंदार देवस्थळीने कलाकारांचे पैसे थकवले; अभिनेत्रीचा गंभीर आरोप
दरम्यान, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने रविवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला. तिच्यानंतर हे मन बावरे या मालिकेतील अन्य कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत देवस्थळींवर आरोप केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या एकाच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
काय आहे शर्मिष्ठा राऊतची पोस्ट?
“गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”.
मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का?’,असा प्रश्नही शर्मिष्ठाने उपस्थित केला आहे.