प्रियंका मोरे या मराठमोळ्या निर्मातीची ‘घासजोमी’ फीचर फिल्म यंदाच्या १९व्या स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय महोत्सवात येत्या २३ जुलैला दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही फीचर फिल्म बंगाली भाषेत आहे. प्रियंकाने मास मीडियामध्ये आपले शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीतून चित्रपटाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने कान महोत्सवात पुरस्कारप्राप्त जाहिरातीसाठी लाईन प्रोड्यूसर म्हणून काम केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंकाने निर्मिती केलेल्या अनेक शॉर्टफिल्म्सना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं. त्याशिवाय “होली राइट्स” या डॉक्युमेंट्रीला राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सुमंत्रा रॉय दिग्दर्शित “घासजोमी” या फिल्ममध्ये अचानकपणे भेटलेल्या दोन महिलांची गोष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल, स्टुटगार्डमध्ये या फिल्मला वर्ल्ड प्रीमियरचा मान मिळाला आहे.

आणखी वाचा- Video : प्रवीण तरडेंनी लंडनमध्ये घेतली मराठी शेतकऱ्यांची भेट, व्हिडीओ चर्चेत

तिच्या या पहिल्याच बंगाली फिल्मच्या निर्मितीविषयी विचारले असता प्रियंका म्हणाली, ‘ फिल्म मेकींग ही एक कला आहे तिला कुठल्याही भाषेचे बंधन नसतं. खरं म्हणजे, या फिल्मची गोष्ट आणि ती सांगण्याची पद्धत मला खूप भावली म्हणून मी ती करण्याचे ठरवले . माझा बंगाली फिल्म बनवण्याचा निर्णय हा सर्वस्वी स्क्रिप्टची मागणी आणि माझे दिग्दर्शक यांच्यावर अवलंबून होता. माझा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता, पण मला यातुन खूप काही शिकायला मिळालं. वेगळ्या संस्कृतीच्या कलाकारांना भेटणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्यासोबत काम करण हा एक वेगळाच अनुभव होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi producer priyanka more new bengali film in international film festival mrj