रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही महामालिका ११ जूनपासून रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.”

आणखी वाचा : ‘आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही’; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्यांचं पत्र

या महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीनेदेखील महत्वाची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवर मराठीतून सुरू होणाऱ्या रामयणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, “रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुशची भूमिका साकारली होती. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi ramayan to broadcast from this date on star pravah ssv