छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून स्वाभिमान मालिकेला ओळखले जाते. स्वाभिमान ही मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. स्वाभिमान ही मालिका स्त्री केंद्रीत विषयांवर आधारित आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका हरहुन्नरी तरुणीची कथा उलगडली जात आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच या मालिकेत शांतनू हा पल्लवीसोबत साखरपुडा करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

स्वाभिमान या मालिकेत लवकरच उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या शांतनू आणि पल्लवी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र अजूनही त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही. तर दुसरीकडे निहारिका ही शांतनूसोबत लग्न करण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Muramba
Video: “हिला रमा बनवणं अवघड…”, अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का? ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Paaru
Video : “माझं आदित्य सरांबरोबर लग्न…”, दारूच्या नशेत काय करणार पारू? मालिकेत येणार ट्विस्ट

सध्या या मालिकेत शांतनू आणि निहारिकाच्या लग्नाची तयारी सुरु आहे. घरात सुरु असलेली लग्नाची तयारी पाहून शांतनू हा फारच वैतागलेला दिसत आहे. यावेळी तो घरात सुरु असलेली तयारी पाहतो आणि साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो. मात्र तो निहारिकासोबत नाही तर पल्लवीसोबत लग्न करणार आहे, असे सांगतो. यावेळीचा एक प्रोमो हा मराठी सिरियल या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता शांतनू आणि पल्लवीचा साखरपुडा होणार का? त्यांचे लग्न होणार का? असा प्रश्न समोर येत आहे.

कंगना रणौतच्या ‘Lock UPP’ चा नवा विक्रम, ४८ तासात मिळाले तब्बल इतके लाख व्ह्यूज

स्वाभिमान या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर, अभिनेता अक्षर कोठारी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत या मालिकेत आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

Story img Loader