छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘स्वामिनी’ ही मालिका कमी कलावधीमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थानं, राजकारणी डावपेच याबरोबरच एका सामान्य मुलीचा राजकन्या बनण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेतून उलगडला जात आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर, रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून आता लवकरच अभिनेत्री नीना कुलकर्णीदेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वामिनी’मध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांची एण्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका अभिनेत्री नीना कुळकर्णी साकारणार आहेत. ताराबाईंच्या येण्याने कथेमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण घटना बघायला मिळतील याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना आहे.

सध्या माधवरावांच्या दुसर्‍या विवाहाची बोलणी करण्यासाठी गोपिकाबाईंनी रमाबाईंना गर्‍हाड्याला राहण्याचा आदेश दिला आहे. ताराबाईंच्या येण्याने रमा – माधवच्या नात्यात कोणते बदल होतील ? मालिकेमध्ये पुढे काय होईल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial swamini actress nena kulkarni role ssj