मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या सगळ्या चर्चांबाबत सिद्धार्थ-तृप्तीने मौन पाळणंच पसंत केलं होतं. मात्र नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थने याबाबतचा खुलासा केला आहे.
रेल्वे स्टेशनवर प्रपोज ते कुटुंबियांचा विरोधात जाऊन केलेलं लग्न, सिद्धार्थ आणि तृप्तीची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

काही दिवसांपूर्वी तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावात बदल केला होता. त्यावेळी तिने तिचे नावं बदलून तृप्ती अक्कलवार असं केलं होतं. तृप्तीने नावामधील जाधव हे आडनाव काढल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली होती. सिद्धार्थ हा त्याच्या दोन्ही मुलींसोबत दुबईला फिरण्यासाठी गेला होता. मात्र त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. पत्नीसोबतचा एकही फोटो शेअर न केल्यानंतर या चर्चांना अजूनच उधाण आले होते.

नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधवला पत्नी तृप्तीसोबत घटस्फोट घेणार का? याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले. “माझ्या पडत्या काळामध्ये मला माझ्या पत्नीने फार मदत केली. तृप्ती ही माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. तिने मला कायमच मदत केली आहे. मी काही चुकीचं करत असेन तर तेव्हाही तिने माझ्यात सुधारणा केली आहे. त्यासोबत चांगल काय, वाईट काय याबद्दलही तिने सांगितले आहे”, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला. त्याच्या या स्पष्टीकरणानंतर सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती घेणार घटस्फोट?

सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या हटके स्टाईल आणि डान्ससाठी सिद्धार्थ ओळखला जातो. सिद्धार्थनं ‘डान्स महाराष्ट्र डान्स सीझन १’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. सिद्धार्थ तमाशा लाईव्ह आणि ‘दे- धक्का’ या २ चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Story img Loader