मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी तो सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसला होता. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अवधूत गुप्तने नुकतंच मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. त्याने त्याच्या या प्रवासाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

अवधूत गुप्ते हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो मुंबईतील एका लोकल रेल्वेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यात तो एका फर्स्ट क्लासने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

त्याने चक्क एक शायरी तयार करत या फोटोंना कॅप्शन दिले आहे. “कैद केले ह्याच शहराने.. जणु तेव्हा मलाही.. लटकलेल्या हातकड्यांना.. मी दिली जेव्हा कलाई..” असे अवधूत गुप्तने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. त्याने कॅप्शनमध्ये दिलेल्या हॅशटॅगनुसार त्याने रविवारी लोकलने प्रवास केला आहे. तसेच त्याच्या हॅशटॅगवरुन त्याला मुंबई शहराबद्दल किती प्रेम आहे ते देखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अवधूत गुप्तेच्या या फोटोंवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. ‘शायरी छान आहे… पण तू का ट्रेनने जातोस’, असा प्रश्न त्याच्या एका चाहत्याने केला आहे. तर एकाने ‘भेट कधीतरी बोरिवलीला… एकत्र जाऊया’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने ‘चक्क ट्रेन’ अशी कमेंट यावर केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘हा फोटो कुठे जाताना काढला आहे’, असा प्रश्न त्याला विचारला आहे. मात्र अवधूतने हा फोटो कुठे जाताना काढला आहे, याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.