प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे कायमच विविध गोष्टींवर भाष्य करत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. अनेकदा ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी एक भलेमोठी पोस्टही केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी विनोदी पोस्टवर भाष्य केले आहे. त्यात त्यांनी एक कविताही लिहिली आहे.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

सलील कुलकर्णी यांची पोस्ट

सतत विनोदी पोस्ट टाकण्याचं दडपण पण दमवणारं असणार… आजुबाजूला घडंतय त्याचं सतत तिरकस वर्णन करा…हशा ( हसण्याच्या emojis) मिळवायचा म्हणून काहीतरी वेगळे शब्द वापरा …मग पोस्ट चा climax म्हणून एक चुरचुरीत वाक्य पेरा …. सातत्याने चावट आणि अश्लील मधली सीमारेषा सांभाळा…

कितीतरी व्याप … मग यमक वगैरे जुळवून काहीतरी ओळ आली तर फारच छान.. फसली तर… आम्ही काही कवी नाही असा एक तिरकस विनोद… मग कंसात काहीतरी लिहून त्यावर कॉमेंट करतांना काय काळजी घ्या ह्याचं मार्गदर्शन करा.. सगळं झालं की त्याला पूरक फोटो शोधा .. नसल्यास तसा काढा .. आणि आसपास काहीही विनोदी घडलं नाही तर मग… तसं घडलं आहे समजून किस्सा रचा ..

मग तो खरा आहे हे आधी स्वतः ला आणि नंतर इतरांना पटवून सांगा …. सूक्ष्मपणे निरीक्षण करतांना असं जाणवलं की अशा मंडळींना सकाळी ते उठले की आधी..आज काय विनोदी लिहिणार ची एक जबाबदारी असणार… सोपं नाही हे काम !!, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याबरोबर त्यांनी एक कविताही शेअर केली आहे.

आणखी वाचा : “माझा नवरा गेल्या ३० वर्षांपासून…”, अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी स्पष्टच बोलली

सलील कुलकर्णी यांनी केलेली कविता

रोज उरावर बसुन स्वतःच्या
लिहितो बंडू पोस्ट विनोदी
शोधुन शोधुन मुद्दे काढून
कधि सरकारी ,कधी विरोधी …

रस्ते,खड्डे,निवडणुकीवर
हल्ला करतो,कीस काढतो
रोज वाटते त्याला की तो
जवळजवळ सरकार पाडतो…

बंडू देतो दाद स्वतः ला
आणिक बंडी दृष्ट काढते
सगे सोयरे म्हणती वा रे
हळूच त्याचे धैर्य वाढते

एक बंडूचे दहा , दहाचे
हजार झाले, रथीमहारथी
एसी मध्ये बसून आता
परस्परांना ” पोस्ट ” मारती …

©️सलील कुलकर्णी.

सलील कुलकर्णी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने चपराक, अगदी सद्य परिस्थितीवर अशी कमेंट केली आहे. तर चपखल टोला अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi singer saleel kulkarni share instagram post talk about comedy show nrp