मराठी रंगभूमी किती समृद्ध आहे ते आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. कित्येक दिग्गज कलाकार या रंगभूमीने आपल्याला दिले. आज मात्र या रंगभूमीची अवस्था फार बिकट आहे. नाटक ही कला डायनॉसोरसारखी एक दिवस या पृथ्वीतलावरून लुप्त होईल अशी परिस्थिती मराठी नाट्यसृष्टीवर ओढवली आहे. यासाठी कलाकार आणि नाट्यनिर्माते जेवढे जवाबदार आहेत तितकेच नाट्यगृहांची देखरेख करणारी मंडळीदेखील जबाबदार आहेत. याच गोष्टीवर मराठी नाट्यसृष्टीचे दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांनी खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूणच सगळीकडची नाट्यगृह आणि खासकरून कल्याण, डोंबिवली या शहरातील नाट्यगृह आणि तिथल्या गैरसोयीबद्दल प्रशांत दामले यांनी खंत व्यक्त केली आहे. प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे खेचून आणायचं काम कलाकारांचं आहे पण एकदा प्रेक्षक तिथे आला की त्याला सगळ्या सोयी सुविधा पुरवणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे असं प्रशांत दामले यांनी सांगितलं.

आणखी वाचा : आजाराबद्दल कळताच चिरंजीवींनी समांथाला पाठवला खास निरोप; म्हणाले, “परिस्थितीशी झुंजणारी…”

कल्याणमधील अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोन्ही नाट्यगृहांबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले, “जग कितीही आधुनिकता आणि सोशल मिडीयाकडे वळलं तरी आजही कल्याण डोंबिवली शहरात आवर्जून नाट्यगृहात जाऊन नाटकं पाहणारे दर्दी रसिक आहेत. मराठी कलाकारांना नेहमीच कल्याण डोंबिवली शहराचं आकर्षण राहीलंय. अनेकदा सोशल मिडियावरून नाट्य कलाकारांनी या शहरातील नाट्यगृहांबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. ही दोन्ही नाट्यगृहं तितकी वाईट नाही पण तितकी छानही नाही…सुधारायला वाव असतो..जसा कलाकाराला सुधारणा करायला वाव असतो तस नाट्यगृहाचंही आहे.”

असं सूचक वक्तव्यं करत प्रशांत दामले यांनी नाट्यगृहात सुधारणा होण्यासाठी विनंती केली आहे. शिवाय डोंबिवलीतील प्रेक्षकांसाठी रात्रीच्या शोनंतर सुरू केलेल्या बसची सुविधाही बंद असल्याने प्रेक्षक नाट्यगृहांपर्यंत येत नाहीयेत ही बाबही प्रशांत दामले यांनी मांडली. प्रशांत दामले यांच्याबरोबर यावेळी केडीएमसी आयुक्तांसह इतर अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र नेमक्या काय सुधारणा पाहिजेत यावर त्यांनी थेट बोलणं टाळलं. शिवाय याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीदेखील चर्चा केली असल्याचं प्रशांत दामले यांनी स्पष्ट केलं आहे.