अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रीय असतात तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावरदेखील असतात. सोशल मीडियावरून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यावरच त्यांनी आता भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दामले यांनी माध्यमांशी संवाद साधला. या नाटकाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की सोशल मीडियावर प्रत्येक प्रेक्षकाला उत्तर देत असता हे कस जमत? त्यावर प्रशांत दामले म्हणाले, “सोशल मीडिया ही गोष्टी अशी आहे की इथे काम करत असताना तुम्हाला समोरच्या प्रेक्षकांना उत्तर देणं हे अध्याहृतच आहे. मी काय एकावेळी वन टू वन हजार प्रेक्षकांना भेटू शकत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या काही अडचणी असतात. प्रेक्षक मला हक्काने सांगत असतात. तेव्हा त्यांना अशी अपेक्षा असते की प्रशांत आपले काम करेल. त्यामुळे त्या सोडवणं हे माझं काम आहे.”

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री मिशेल योहला पडली ‘या’ बॉलिवूडच्या अभिनेत्याची भुरळ; म्हणाली “तो मोठ्या मनाचा…”

सोशल मीडियावर सक्रीय राहून ते नाटकांच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव चाहत्यांशी शेअर करत असतात. कित्येक चाहते त्यांचे कौतुक करत असतात तर अनेकदा त्यांच्यावर टीकादेखील करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५००वा नाट्यप्रयोग सादर केला होता.

दरम्यान ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचं लेखन संकर्षणनं केलं आहे. प्रशांत दामले यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. हे एक कौटुंबिक, विनोदी नाटक असून संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार नाटकात दिसणार आहेत. तसेच प्रशांत दामले यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘सारखं काहीतरी होतंय’ ही दोन नाटकं रंगभूमीवर सुरु आहेत. या दोन्ही नाटकांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi theatre actor prashant damle open up about social media responding and audience spg