मराठी कलाविश्वात सध्या नव्या धाटणीच्या आणि नव्या विषयांवर आधारित चित्रपट, मालिकांची निर्मिती होताना दिसत आहे. यामध्येच सध्या अनेक मालिका या स्त्रीकेंद्रित असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच एका विषयावर आधारित स्वाभिमान ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या पूजा बिरारीची खास मुलाखत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्र. मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?

उ. स्वाभिमान या मालिकेत मी पल्लवी शिर्सेकर ही भूमिका साकारत आहे. दापोलीसारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या पल्लवीची अनेक स्वप्न आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ही पल्लवी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. तिला प्रोफेसर व्हायचं आहे. त्यामुळे तिच्या निर्णयावर ती ठाम आहे. यात तिचं कुटुंब तिची साथ देतात की नाही हे सारं या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

प्र. अभिनय क्षेत्रात करिअरची वाट निवडताना कुटुंबाचा पाठिंबा होता का?

उ.  हो. नश्चितपणे मला माझ्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला होता. कॉम्प्युटर सायन्समधून मी शिक्षण घेतलं आहे. पण अभिनयाची आवड असल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. मी माझ्या आई-बाबांना जेव्हा याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वात ठेवत मला या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं बळ दिलं.

प्र.  पहिलीच मालिका आहे आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय काय सांगशील याविषयी?

उ. खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रोमोमध्ये समुद्र किनाऱ्यावर मी सायकल चालवली आहे. मला माझ्या बाबांनी लहानपणी सायकल चालवायला शिकवली होती. त्याचा उपयोग मला मालिकेसाठी झाला. खूप छान अनुभव होता. मालिकेत कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि फ्रेम्स प्रोडक्शन्स सारखं उत्तम प्रोडक्शन हाऊस हा सुवर्णयोग जुळून आला आहे. स्वाभिमान मालिकेतला माझा लूकही खूप छान आहे. प्रत्येक कलाकाराचं ड्रीमरोलचं एक स्वप्न असतं. माझ्यासाठी पल्लवी ही व्यक्तिरेखा म्हणजे माझा ड्रीमरोलच आहे.