छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेत नवे वळण आले आहे. अभिषेक आणि अनघा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच ऐन लग्नात अनिरुद्धने अरुंधतीचा मित्र आशुतोषला भर लग्नातून बाहेर काढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्येस ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागामध्ये अभि-अनघाच्या लग्नात पुन्हा नवं संकट उभं राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अनिरुद्ध आशुतोषला हकलवणार अभिच्या लग्नातून, आशुतोषची बाजू घेऊन अरुंधती अनिरुद्धला सुनावणार खडेबोल असे म्हटले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यामधील मैत्रीचे नाते पाहून अनिरुद्धला त्रास होत असल्याचे आपण पाहिले. ते त्यांची मैत्रीपाहून संताप व्यक्त करत असतो. अनिरुद्ध अनेकदा आशुतोषचा अपमान देखील करत असतो. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागामध्ये आशुतोष असे काय करतो की अनिरुद्ध त्याला भर मंडपातून हकलून देतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.