छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरत असलेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले असून प्रत्येक कलाकाराने स्वत:चं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. शुभ्रा, आजोबा,अभिजीत राजे यांच्याप्रमाणेच मॅडी हीदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. निरागस स्वभाव आणि तितकीच खोडसाळ दाखविलेल्या मॅडीची भूमिका अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालिकेमध्ये शेफ अभिजीत राजे यांच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारी मॅडी अर्थात भक्ती रत्नपारखी यापूर्वी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शो मध्ये झळकली होती. त्यामुळे तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यातच या मालिकेमध्ये तिने वठविलेली भूमिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळेच तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये काम करण्यापूर्वी भक्तीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मध्ये तिने केलेल्या कामामुळे अनेकांची मनं जिंकली होती. मालिकेमध्ये थोडीशी अल्लड, निरागस दिसणारी मॅडी खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर दिसते. भक्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने काही फोटो पतीसोबतही शेअर केले आहेत. भक्तीचा पतीही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

दरम्यान,भक्ती रत्नपारखी हिने मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते निखिल रत्नपारखी याच्याशी लग्न केलं आहे. निखीलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका निभावल्या आहेत. निखील रत्नपारखी यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे.