छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून सरु आजीमुळे डॉ. अजितचं बिंग फुटणार आहे. इतकंच नाही तर आता सरु आजी अजितच्या मार्गातील अडथळा ठरत असल्यामुळे त्याने सरु आजीला संपवण्याचा निर्धार केला आहे.

‘देवमाणूस’ या मालिकेत अजितने मंजूच्या जमिनीविषयी अनेक अफवा पसरवल्या आहे. मात्र, या अफवांचा सरु आजीमुळे सुगावा लागणार आहे. अजित संजूचा खून करुन त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरत असताना त्याचवेळी सरु आजी येते. पण सरु आजीने नेमकं काय पाहिलं आहे हे अजितला समजलं नाहीये. त्यामुळे सध्या तो काळजीत आहे. तर दुसरीकडे मात्र, सरु आजी पोलिसांकडे धाव घेते. त्यामुळे अजित चांगलाच घाबरला आहे. त्यामुळेच तो आता सरु आजीला मार्गातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, आजी डोईजड झाल्याचं अजितला वाटत असल्यामुळे त्याने सरु आजीचादेील काटा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा हा डाव यशस्वी होईल की अयशस्वी हे येत्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader