कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या अनुला अखेर चांगला जॉब मिळाला आहे. मात्र अनुच्या जॉबबद्दल प्रणयला अजिबात कल्पना नाही. मात्र सिद्धार्थ काम करत असलेल्या कंपनीत अनुला नोकरी मिळाल्याची शंका प्रणयला येत आहे. इतकंच नाही तर दुर्गाच्या मनात अनुविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो दुर्गाच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. विशेष म्हणजे तो दुर्गासमोर तो सिद्धार्थचं सत्यदेखील उघड करतो. हे सत्य ऐकल्यानंतर दुर्गा अनु आणि सिद्धार्थला वेगळं करण्यासाठी कट रचते.
दुर्गाच्या मनात पहिल्या भेटीपासूनच अनुविषयी गैरसमज आहे. तिला अनु अजिबात आवडतं नाही. त्यामुळे सिद्धार्थ आणि तिच्यातील मैत्री दुर्गाला खटकते. मात्र तिने सिध्दार्थला अनुपासून तोडण्याचा प्रयत्न केला तर सिध्दार्थ तिच्या विरोधात जाऊ शकतो. आणि म्हणूनच दुर्गा अनुला सिध्दार्थचे सत्य लवकरच सांगणार आहे.
अनु आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आणण्यासाठी दुर्गाने रचलेली खेळी यशस्वी होईल का ? अनु आणि सिद्धार्थ मध्ये दुरावा येईल का ? सिद्धार्थ अनुला त्याची बाजू समजवू शकेल का ? अनुच्या घरी विशाखाच्या वाढदिवसाची तयारी सुरु असताना दुर्गा मिठाचा खडा टाकणार का ? हे बघायला विसरू नका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मध्ये रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.