‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात अभिनेत्री म्हणून आदिती द्रविडला ओळखले जाते. या मालिकेच्या माध्यमातून ती लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड यांचं फार खास नातं आहे. नुकतंच तिने याबाबतचा खुलासा केला आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अदिती द्रविड ही चांगलीच प्रसिद्ध झाली. अदिती ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच अदिती द्रविड हिने ‘Ask Me Anything’ सेशनद्वारे लोकांशी गप्पा मारल्या. यावेळी तिला एका चाहत्याने राहुल द्रविडबद्दल एक प्रश्न विचारला. त्याचे तिने फार हटके पद्धतीने उत्तर दिले.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचं आहे राहुल द्रविडसोबत खास कनेक्शन, वाढदिवसानिमित्त शेअर केलं सिक्रेट

नुकतंच एका चाहत्याने तिला ‘राहुल द्रविड आणि तुझ्यात खरंच कोणतं नातं आहे का? की या फक्त अफवा आहेत, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना तिने राहुल द्रविड याच्यासोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला. त्यासोबत ती म्हणाली ‘हो हे खरं आहे. राहुल द्रविड हे माझे चुलत काका आहेत.’

तिच्या या उत्तराचे स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. तसेच यामुळे ती फार चर्चेतही आली आहे. दरम्यान यापूर्वीही अदितीने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘आपण एकाच कुटुंबातील आहोत याचा मला अभिमान आहे’, असे तिने यावेळी म्हटले होते.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील अदिती द्रविडचा अल्बम

“तसेच मला आपले आडनाव फार आवडते. त्यामुळे मी कधीही ते बदलत नाही. खूप प्रेम आणि आदर,” असेही अदिती म्हणाली होती. ती सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ईशा आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत तुळसा या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader