Pune Porsche Crash Latest Updates: गेल्या आठवड्यात मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमध्ये दोन घटना घडल्या आहेत. मुंबईत होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तसंच पुणे येथे पोर्शच्या धडकेत एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. या दोन घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्यानंतर मराठी दिग्दर्शकाने एक पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातली घटना नेमकी काय?

अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. पोर्शे कारने या दोघांना चिरडलं. पोर्शे कार चालवणारा कारचालक हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. तो एका प्रतिथशय बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून या मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.

कल्याणीनगर भागातली घटना

पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

हे पण वाचा- Pune Porsche crash:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

घाटकोपरची घटना काय?

१५ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय फलक कोसळून पडला होता. पेट्रोल पंपावर पडलेल्या या फलकाखालून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातल्या मृतांची संख्या १६ झाली. दोन दिवस फलक काढण्यासाठी गेले फलक काढण्याकरता अडचणींचा डोंगर उभा राहिला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या दोन्ही घटनांबाबत दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी फेसबुक पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे.

घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर १२०*१२० स्क्वेअरफुटाचा महाकाय जाहिरातीचा फलक लावण्यात आला होता. या जाहिरातीच्या फलकालाच्या मंजुरीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. परंतु, कोसळलेल्या या फलकाखाली अनेक गाड्या दबल्या होत्या. जवळच पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या ४८ हून अधिक तासांपासून तिथे बचावकार्य चालू होतं.

क्षितिज पटवर्धन यांची पोस्ट काय?

मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त! अशी पोस्ट क्षितिज पटवर्धन यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi writer director kshitij patwardhan post about pune porsche accident and ghatkopar hording scj