कलाविश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकरी मतकरी यांनी रविवारी(१७मे) जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. उत्तम साहित्याची रचना करणाऱ्या या लेखकाची अनेक पुस्तकं गाजली. यामध्ये त्यांच्या गूढकथांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग होता. मतकरी यांनी जवळपास दिडशेपेक्षा जास्त गूढकथांचं लेखन केलं आहे. त्यासोबतच त्यांच्या काही कादंबऱ्या, कथासंग्रहदेखील गाजले. रत्नाकर मतकरी यांनी जवळपास ३२ नाटकं, २३ कथासंग्रह,६ निबंध संग्रह,१६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्या असे विविध कलाकृतींच्या माध्यमातून विपुल लिखाण केलं आहे. यापैकी त्यांची काही गाजलेले पुस्तकं.
‘अपरात्र’ (कथासंग्रह), ‘अंश’ (कथासंग्रह), ‘इन्व्हेस्टमेंट’ (कथासंग्रह), ‘एक दिवा विझताना’ (कथासंग्रह), ‘ऐक टोले पडताहेत’ (गूढकथासंग्रह), ‘कबंध’ (कथासंग्रह), ‘खेकडा’ (कथासंग्रह), ‘गहिरे पाणी’, ‘गोंदण’ (कथासंग्रह), ‘चार दिवस प्रेमाचे’ (ललित), ‘जौळ’ (कथासंग्रह), ‘तृप्त मैफल’ (कथासंग्रह),’२ बच्चे २ लुच्चे’ (बालसाहित्य), ‘धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी’ (बालसाहित्य), ‘निजधाम’ (कथासंग्रह), ‘निम्माशिम्मा राक्षस’ (बालसाहित्य), ‘निर्मनुष्य’ (कथासंग्रह), ‘परदेशी’ (कथासंग्रह), ‘पानगळीचं झाड’,’ सरदार फाकडोजी वाकडे’ (बालसाहित्य), ‘फाशी बखळ’ (कथासंग्रह), ‘भूत-अद्भुत’ (बालसाहित्य), ‘मध्यरात्रीचे पडघम’ (कथासंग्रह), ‘महाराजांचा महामुकुट’ (बालनाट्य), ‘महाराष्ट्राचं चांगभलं’ (ललित), ‘माकडा माकडा हुप !’ (बालसाहित्य), ‘मांजराला कधीच विसरू नका’ (नाटक, बालसाहित्य), ‘मृत्युंजयी’ (गूढकथासंग्रह), ‘रंगांधळा’ (कथासंग्रह), ‘रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा : भाग १, २’. (संपादक गणेश मतकरी), ‘रत्नाक्षरं – रत्नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य’ (ललित), ‘राक्षसराज झिंदाबाद ‘(बालसाहित्य), ‘शाबास लाकड्या ‘(बालसाहित्य), ‘शांततेचा आवाज’ (ललित), ‘संदेह’ (कथासंग्रह), ‘संभ्रमाच्या लाटा’ (कथासंग्रह), ‘सहज’ (कथासंग्रह), ‘सोनेरी सावल्या’ (ललित), ‘स्वप्नातील चांदणे’ (परिकथासंग्रह), ‘हसता हसविता’ (ललित). असं अफाट लिखाण रत्नाकर मतकरी यांनी केलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी कादंबरी लिखाणही केलं आहे.
दरम्यान, ज्यांनी लिखाणाच्या जोरावर वाचकांना आपलंसं केलं त्या रत्नाकर मतकरी यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी १९५५ मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकिकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर सुरु झाललेला हा प्रवास ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी इथपर्यंत येऊन पोहोचला होता.