प्रसिद्ध पॉप गायिका मारिया केरी आपल्या पाळीव कुत्र्याच्या अलिशान हॉलिडेसाठी १ लाख १५ हजार पाऊंड एव्हढा खर्च करणार असल्याचे समजते. यामध्ये त्यांच्या अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंतच्या प्रवासाचा १ लाख पाऊंडचा खर्च आणि कुत्र्याला एका अलिशान हॉटेलमध्ये राहण्यासाठीचा १५ हजार पाऊंडाचा खर्च समाविष्ट असल्याचे ‘कॉन्टॅक्ट म्युझिक’च्या वृत्तात म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यासाठीच्या या अलिशान हॉटेलमध्ये त्यांना मिळणार आहे – शाही आंघोळ, नट्टापट्टा, एक दिवसाची भटकंती, झोपण्यासाठी स्वत:चा बेड आणि त्यांच्या आवडीचे खाणे बनविण्यासाठी एक खास शेफ दिमतीला असणार आहे. १ लाख पाऊंड खर्च करून एका प्रायव्हेट जेटने सुटीची मजा लुटण्यासाठी ते इंग्लंडला जाणार आहेत. आपल्या या प्राणी मित्रावर असा भरमसाठ पैसा खर्च करणे हे तिच्यासाठी काही नवीन नाही. मोरोक्कन आणि मॉर्नो या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असलेल्या मारियाने पाळीव कुत्रांच्या उत्तम देखभालीसाठी वर्षाकाठी २८ हजार पाऊंड खर्च केल्याची चर्चा आहे.
अबब! मारिया केरीच्या पाळीव कुत्र्यांचा हॉलिडे खर्च १ लाख १५ हजार पाऊंड?
प्रसिद्ध पॉप गायिका मारिया केरी आपल्या पाळीव कुत्र्याच्या अलिशान हॉलिडेसाठी १ लाख १५ हजार पाऊंड एव्हढा खर्च करणार असल्याचे समजते.

First published on: 06-08-2014 at 05:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mariah carey spends 115k pounds on dog holiday