कतरिना कैफ आणि रणबीर कपूर वारंवार त्यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांचे खंडन करीत आले आहेत. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, आता ही जोडी एक पाऊल पुढे जाण्याच्या बेतात असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण कोर्सिकामध्ये इम्तियाझ अली दिग्दर्शित ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यावेळी रणबीरबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी कतरिना तिकडे गेली होती. ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा उरकला असून, कतरिनाची आई सुझानला भेटण्यासाठी तो लंडनवारी करणार असल्याचे समजते. लवकरच आपण लग्न करणार असल्याचे संकेत रणबीरने अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान दिले होते. लंडनवरून परतल्यावर तो ‘रॉय’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अर्जुन रामपाल आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यादेखील भूमिका आहेत.

Story img Loader