अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांचा विवाह लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोहाचा भाऊ छोटा नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नानंतर कुणाल आणि सोहा यांच्या विवाहाच्या अफवा पसरु लागल्या. याबद्दल कुणाल म्हणाला की, “सध्यातरी मी लग्नाची कोणतीही तयारी केलेली नाही पण, सर्व काही ठीक राहीले, तर लवकरच आम्ही लग्न करू”. गेल्या काही दिवसांपासून सोहा आणि कुणाल कार्यक्रमांना एकत्र उपस्थितीत असताना दिसले. सोहाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने कुणाल बरोबर राहायला जाणार असल्याचेही स्पष्ट केले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील खार परिसरात दोघांनी एक घरसुद्धा घेतले आहे.     

Story img Loader