अभिनेता ह्यु जॅकमन याने साकारलेली ‘वुल्वरिन’ ही व्यक्तिरेखा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तब्बल १८ वर्ष जॅकमन ‘वुल्वरिन’ अवतारात रुपेरी पडद्यावर झळकत होता. परंतु मार्व्हलने दोन वर्षांपूर्वी ‘लोगन’ या सुपरहिरोपटातून ‘वुल्वरिन’चा शेवट केला. आपला आवडता सुपरहिरो एकाएकी संपवल्यामुळे नाराज झालेल्या चाहत्यांनी आता मार्व्हल विरोधात पत्राच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या मागणीतील गंमतीशीर बाब म्हणजे ह्यु जॅकमन तयार नसेल तर, डॅनी डेविटो याला ही भूमिका साकारण्यासाठी तयार करावे, अशी मागणी चाहते करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॅनी डेविटो हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो. इतर सुपरहिरोंच्या तुलनेत ‘वुल्वरिन’ हा काहीसा गंभीर सुपरहिरो आहे. तसेच डॅनीकडे सुपरहिरो भूमिकेला अभिप्रेत असलेले पिळदार शरीर नाही. तसेच त्याने आजवर कुठल्याच अॅक्शन चित्रपटात काम केलेले नाही. तब्बल ३० हजार पेक्षा अधिक ‘वुल्वरिन’ चाहत्यांनी Change.org या वेबसाईटमार्फत डॅनी डेविटो यालाच संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

ह्यु जॅकमनने का सोडला वुल्वरिन?

‘वुल्वरिन’ हा सुपरहिरो एक्समेन चित्रपट मालिकेतील आहे. अभिनेता जॅकमन तब्बल १८ वर्ष वुल्वरिन ही व्यक्तिरेखा साकारत होता. अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘वुल्वरिन’चा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला होता. परंतु जॅकमनला ही व्यक्तिरेखा मार्व्हलचा सर्वात मोठा चित्रपट अॅव्हेंजर्समध्ये यावी अशी इच्छा होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या जॅकमनने अखेर ही व्यक्तिरेखा थांबवली.